​प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'प्रबोधनरत्न' पुरस्कार; परळीत  सत्कार



परळी ,प्रतिनिधी:

प्रख्यात सिने नाट्य लेखक आणि दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'एकता रंगकर्मी प्रबोधनरत्न पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचा परळी येथे भव्य सत्कार करण्यात आला. परळी सिने नाट्य कलावंत संघटना व मित्रपरिवारातर्फे डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.

यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ.सिद्धार्थ तायडे यांचे स्वागत व अभिनंदन केलेज्येष्ठ साहित्यिक व संपादकभीमयुगकार रानबा गायकवाड,प्रसिद्ध कवी व निवेदक बा. सो. कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, नवनाथ दाने, दत्ता मामा लांडे, मुख्याध्यापक शेख सर, शास्त्री कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...