इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती निमित्त ना. पंकजा मुंडे यांनी सोमठाण्यात केली महाआरती



रेणुकामाता मंदिराला तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील ; मंदिर परिसरात केले वृक्षारोपण

जालना दि. १४ ---

सोमठाणा (ता. बदनापूर) येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिराला तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला बारा  वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते आज महाआरती आणि मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

   ना. पंकजाताई मुंडे आज जालना दौऱ्यावर आल्या होत्या.छत्रपती संभाजीनगर येथून जालन्याकडे जाताना रस्त्यात बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिरात त्यांनी महाआरती केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासाचे एक तप पूर्ण केले आहे, तळागाळातील सर्व सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प पूर्ण करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी देखील त्यांनी यावेळी प्रार्थना केली. याप्रसंगी मंदिर ट्रस्टने केलेल्या मागणीनुसार मंदिराच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत असे सांगून नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा दर्शनाला येऊ असा शब्द त्यांनी दिला. आ. नारायण कुचे, प्रवीण घुगे, सतीश नागरे, बद्रीनाथ पठाडे आदी यावेळी उपस्थित होते. मंदिर ट्रस्टच्या वतीने याप्रसंगी ना. पंकजाताईंचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या वृक्ष लागवड देखील करण्यात आली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या