धनंजय मुंडे यांच्या पंकजाताईंना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा!

स्व. मुंडे साहेबांच्या विचारांची आपण दोन पावले, एकत्रित साहेबांच्या स्वप्नांना गती देऊ !



 धनंजय मुंडे यांच्या पंकजाताईंना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा!


मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांची आपण दोन पावले आहोत, कधी एक पाऊल पुढे तर दुसरे मागे हा अलिखित नियम मोडीत काढून दोन्ही पावले सोबत टाकून एकत्रित स्व. मुंडे साहेबांच्या स्वप्नांना गती देऊ; अशा खास शैलीत श्री. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत आहे.

आपल्या पोस्ट मध्ये धनंजय मुंडे यांनी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा माझी बहीण ना. पंकजाताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यावरणाच्या सशक्तीकरण व वातावरणाच्या शुद्धीचा जो ध्यास ताई तू घेतला आहेस, त्याला पूर्ण करण्याची प्रभू वैद्यनाथ तुला शक्ती देवोत अशी प्रार्थना करत धनंजय मुंडे यांनी पंकजाताई विभागामार्फत करत असलेल्या कामाचे कौतुक देखील केले आहे. 

आपण कोणत्याही प्रसंगात मोठा भाऊ म्हणून कायम पाठीशी आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणालेत. 

धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे हे भावंड राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यानंतर त्यांच्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट व मजबूत होताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये देखील सकारात्मक ऊर्जा वाढलेली दिसून येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...