मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन....
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान: ३० जुलै रोजी परळी वैजनाथ येथे समाधान शिबिर
बीड दि. 29 ( प्रतिनिधी ): उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताई लॉन्स, इटके कॉर्नर, शासकीय विश्रामगृहाजवळ, परळी वैजनाथ येथे होणार आहे.
या शिबिरास आमदार धनंजय मुंडे, मंत्री पंकजाताई मुंडे, बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विनोद रनवरे, तहसीलदार विलास तरंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना दाखले, मंजुरीपत्रे तसेच आर्थिक धनादेशांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व लाभार्थी, शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी या समाधान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसील कार्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा