महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान परळी वैजनाथ | प्रतिनिधी महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला , तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले....