अभिनंदन....!!!!!

 कथालेखनासाठी बिपीन देशपांडे यांना पुरस्कार




 परळी वैजनाथ - प्रतिनिधी...येथील विवेकानंद महाविद्यालय आणि प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या काव्यवाचन व कथालेखन स्पर्धेतील विजेत्यांना  प्रगतिशील साहित्य संमेलनात पुरस्कार देऊन शनिवारी गौरवण्यात आले.            विवेकानंद महाविलयात पार पडलेल्या सोहळ्यात कथालेखन स्पर्धेतील व्दितीय पारितोषिक वरिष्ठ पत्रकार बिपीन देशपांडे यांना त्यांच्या "६४ पायऱ्या अन लिफ्ट" साठी प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख ७७७ रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रगतिशील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथाकार उत्तम बाविस्कर, उदघाटक तथा प्रसिद्ध कवी, गीतकार प्रवीण मोरे (मुंबई), कादंबरीकार, प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, महासचिव राकेश वानखेडे, ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे, विवेकानंदचे मराठी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय डुंबरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बिपीन देशपांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेसाठी ४० पेक्षा अधिक कथा आल्या होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार