इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

प्रतिलिपी मराठीच्या वतीने प्रदीप कुलकर्णी यांच्या श्रावणी कादंबरीला प्रमाणपत्र




माजलगाव (प्रतिनिधी)- प्रतिलिपी या नामांकित डिजिटल साहित्य मंचाने आयोजित केलेल्या “प्रतिलिपि क्रिएटर्स लेखन चॅलेंज – सीझन 4” मध्ये सुप्रसिद्ध लेखक प्रदीप कुलकर्णी यांनी आपल्या लोकप्रिय कथामालिका ‘श्रावणी' चे यशस्वीरित्या ५० पेक्षा अधिक भाग पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

     लेखनातील सातत्य, कल्पकता आणि वाचकांना खिळवून ठेवणारी शैली यामुळे ‘श्रावणी’ या कादंबरीला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उल्लेखनीय यशाची दखल घेत प्रतिलिपी मराठीच्या वतीने लेखक प्रदीप कुलकर्णी यांना ‘प्रतिलिपि क्रिएटर्स प्रोग्राम सीझन 4’ चे अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

    लेखन क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले प्रदीप कुलकर्णी हे सामाजिक जाणिवा, मानवी भावभावना आणि वास्तववादी कथानकासाठी ओळखले जातात. ‘श्रावणी’ या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी वाचकांशी भावनिक नातं निर्माण केलं असून, डिजिटल साहित्यविश्वात मराठी कथालेखनाचा दर्जा अधिक उंचावला आहे.

    या यशाबद्दल साहित्यप्रेमी, वाचकवर्ग आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळातही त्यांच्याकडून अधिक दर्जेदार साहित्यनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या