साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बालसभा

अनोख्या पद्धतीने मूल्यवर्धन बालसभा






वीस वेगवेगळ्या मूल्यांवर वीस विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली आणि वक्तृत्व कला आणि आपल्या विचार शैलीला वाव देत साने गुरुजी यांची जयंती साजरी केली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे यावेळी अनोख्या पद्धतीने मूल्यवर्धन बालसभाही घेण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी केंद्र कन्हेरवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी दर महिन्याला बालसभेचे आयोजन केले जात आहे. इयत्ता चौथी पासून सातवी पर्यंतच्या वर्गातील प्रत्येकी पाच वेगवेगळे विद्यार्थी या बालसभेतून आपल्या वक्तृत्व कलेला व्यासपीठ मिळवून घेत आहेत. 

24 डिसेंबरला साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बालसभा इंदपवाडीच्या शाळेत संपन्न झाली. या बालसभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी ओमराज बळीराम मुंडे याची तर व्यासपीठावर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशवराव मुंडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांची तसेच महिला पालकांची उपस्थिती होती. 

सर्वप्रथम साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म या गीताचे गायन केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनी कु अमृता मुंडे आणि कु प्रीतम मुंडे यांनी केले.

शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशवराव मुंडे यांनी बालसभेच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वीस मूल्यांवर आपली मते मांडत भाषणे केली याबद्दल त्यांचे कौतुक केले. साने गुरुजींच्या आयुष्यावर त्यांनी प्रकाशही टाकला. 

शाळेतील शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी साने गुरुजींनी लिहिलेल्या "श्यामची आई" या पुस्तकातील एका कथेचे साभिनय सादरीकरण करत विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी आपल्या आईशी एक तास गप्पा मारून तिची मुलाखत घेण्याचे सुचवले. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांनी शाळेने गेल्या वर्षी श्यामची आई पुस्तकाचे प्रकट वाचन झाल्याची आठवण करून दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ओमराज याने अध्यक्षीय समारोप केला आणि स्वतःला अध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल त्याच्या मित्रांचे आणि शिक्षकांचे आभार व्यक्त केले. 

बालसभा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक श्री चंद्रप्रकाश लोखंडे, श्री विष्णू ढाकणे, श्री जगदीश चौधरी, श्री चंद्रशेखर फुटके, श्री दीपक खंदारे यांच्यासह इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार