परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

सहुलत विना व्याजी पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे थाटात उद्घाटन

 सावकारीचा संपूर्ण बहिष्कार करा ; युवकांनी व्याजापासून दूर राहा - मुफ्ती अश्फाक खासमी 




सहुलत विना व्याजी पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे थाटात उद्घाटन

परळी/प्रतिनिधी 

परळी शहरातील शहीद अब्दुल हमीद शादीखाना येथे आज शनिवारी दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सहुलत विना व्याजी पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

या प्रसंगी संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचा आढावा घेण्यात आला. स्थापनेपासून आजपर्यंत पतसंस्थेने शहरातील सुमारे ५,००० हून अधिक गरजू नागरिकांना विना व्याज कर्जपुरवठा केला असून, या लाभार्थ्यांमध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा समावेश आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना व्याजाच्या जोखडातून मुक्त ठेवून स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, मुफ्ती अश्फाक खासमी होतं तर प्रमुख पाहुणे मौलाना तैमुर मिल्ली होते. तर मंचावर उपस्थित जमाते इस्लामी हिंदचे परळी शहराध्यक्ष इफ्तेखार सर, पतसंस्थेचे चेअरमन अन्वर सर, महेबुबिया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खाजा मामू, सेक्रेटरी जाफर खान,मुखद्दस साहेब,अबरार खान व जिशान खान हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात दोन प्रमुख वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  मौलाना तैमुर मिल्ली यांनी सांगितले की, कुरआनमध्ये अनेक ठिकाणी अल्लाह तआलांनी व्याज याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. व्याज ही केवळ आर्थिक समस्या नसून ती समाजाच्या नैतिकतेला व कुटुंबव्यवस्थेला पोखरणारी घातक प्रवृत्ती आहे. त्यामुळे समाजाने विना व्याज व्यवहार स्वीकारून गरजूंची मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.‌ नंतर मुफ्ती अश्फाक यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, सावकारी ही समाजातील सर्वात मोठी सामाजिक व्याधी असून ती संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांनी उपस्थितांना व्याजावर चालणाऱ्या सावकारी व्यवहारांचा संपूर्ण बहिष्कार (बॉयकॉट) करण्याचे आवाहन केले. तसेच, युवकांनी सावकारीपासून दूर राहावे व समाजात विना व्याज आर्थिक संस्कृती रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा,असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमास पतसंस्थेचे सभासद तसेच परळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या