इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 भीषण अपघात; 14 ऊसतोड मजूर जखमी;एक बैल ठार



कडा :शेंडगेवाडी (सावरगाव गड), ता. आष्टी येथील ऊसतोडणी कामगारांवर गुरुवारी पहाटे अपघाताचा कराळ झटका बसला.वृद्धेश्वर साखर कारखाना,पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे तोडणीसाठी जात असताना तिसगाव-शेवगाव मार्गावर समोरून येणाऱ्या टाटा चेसिस वाहनाने अचानक विरुद्ध दिशेने येऊन बैलगाड्यांना जोरदार धडक दिली.धडकेत बैलगाड्या तब्बल 200 फूट फरफटत गेल्या.या घटनेत पाच बैलांचे हाडे मोडली असून एक बैल जागीच ठार झाला.मजुरांची उपजीविका उद्ध्वस्त करणारी ही गंभीर हानी मानली जात आहे.

14 ऊसतोडणी मजूर जखमी:गंभीर जखमी मध्ये पूजा नाना शेंडगे (30)शरद शेंडगे (40) दोघांना पुढील उपचारासाठी इंपल्स हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले.उर्वरित 12 मजूर त्यात अभिषेक मरगळ,विशाल मरगळ,कोमल ठेंगल, राणी ठेंगल,सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, राणी गोल्हार, बबन शेंडगे,लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे,अशोक ठेंगल, तुळजाई शेंडगे यांच्यावर श्री.हॉस्पिटल,तिसगाव येथे उपचार सुरू आहेत.

◆ आ. सुरेश धस घटनास्थळी दाखल

पहाटे सहाच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तातडीने माहिती देत जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले.आ.धस यांनी तिसगाव येथील रुग्णालयात जखमींची भेट घेऊन उपचारांची माहिती घेतली.तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो.उ.नि.पुजारी यांच्याकडे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच या मार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवले जावे,दोषी वाहनचालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट