डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ - डॉ. भरत मुंडे टोकवाडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणात डॉ. भरत मुंडे यांनी कविता सादर करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगास...