मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 परळीत उद्या सामूहिक श्रीसूक्त हवन सोहळा



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

येथील अंबेवेस भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य बहुसोमयाजी श्री यज्ञ मार्तंड सद्गुरु श्री यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा धार्मिक विधी संपन्न होणार आहे.

श्री सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित या हवनासाठी लागणारे सर्व साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सामूहिक अनुष्ठानात सहभागी होऊन जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनाचा व हवनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा हवन सोहळा सायंकाळी ठीक ५:३० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाची सांगता वेळेत व्हावी, या दृष्टीने भाविकांनी वेळेचे बंधन पाळावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, सर्व यज्ञसेवकांनी पूर्वतयारी आणि सहकार्यासाठी सायंकाळी ५:०० वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...