महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

 परळीत  महिलांसाठी  आयोजित मोफत कर्करोग निदान शिबिराचे नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन




महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळोवेळी सर्व तपासण्या केल्या पाहिजे - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी

परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

    आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्यविषयक काळजी वाहणाऱ्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबतही जागरूक राहून वेळोवेळी सर्व तपासण्या केल्या पाहिजे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी केले. परळी वैजनाथ येथील अरिहंत जैन सेवाभावी संस्था आणि विवेकानंद कॅन्सर अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'मोफत कर्करोग निदान शिबिरा'चे उद्घाटन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

   परळी वैजनाथ येथे आयोजित मोफत शिबिराचा मोठ्या संख्येने महिला वर्गाने लाभ घेतला. या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग निदानासाठी आधुनिक 'कोल्पोस्कोपी' व 'थर्मल ब्रेस्ट स्क्रीनिंग'द्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. डॉ. वैशाली भावठाणकर, डॉ. स्मिता तापडीया आणि डॉ. सौ. सुनीता झांवर यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी सांगितले की, आजच्या धावपळीच्या युगात महिला आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतात, मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळीच निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अरिहंत जैन संस्थेने महिलांच्या आरोग्यासाठी राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज आहे. अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तपासणी सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहून तपासणी करून घेण्याचे आवाहनही केले.

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरिहंत जैन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रीतम बोरा, सचिव धिरज बडेरा, महावीर कांकरिया, आशिष गादिया यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेतले तसेच शिबिराच्या यशस्वीतेसाठी जैन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....