महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर





सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली


महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध 

परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

   परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.

        राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष खैसर राजा खा पठाण, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, संगणक अभियंता लक्ष्मीकांत देशमुख, सभा व्यवस्थापन प्रमुख सत्यजित पिटके, सहाय्यक विक्रम स्वामी आदींनी या अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी ऑनलाईन इतिवृत्त प्रसिद्ध व्हावे यासाठी आवश्यक ती संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे आता नगर परिषद  सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे इतिवृत्त ऑनलाइन प्रसिद्ध होणार आहे. या माध्यमातून कामकाजात पारदर्शकता आणली गेली आहे.आता घरबसल्या नगर परिषदेचे निर्णय नागरिकांना पाहता येणार आहेत. सर्व ठराव आता कायमस्वरूपी ऑनलाईन स्वरूपात जतन केले जाणार आहेत.नगर परिषदेच्या या निर्णयामुळे शहरात होणारी विकासकामे, मंजूर निधी आणि प्रशासकीय निर्णय यांची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर येणार आहे. परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजातील ऑनलाईन इतिवृत्तांमध्ये प्रामुख्याने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली सर्वसाधारण सभा आणि २० एप्रिल २०२६ रोजी पार पडलेली स्थायी समितीची सभा यांचे सविस्तर इतिवृत्त आणि ठराव पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. यापुढील सर्व ठराव व इतिवृत्ते लोकप्रतिनिधी व नागरिकांना एका क्लिकवर ऑनलाईन पाहता येणार आहेत. 

      लोकप्रतिनिधी व  नागरिकांनी  https://mahaulb.in या संकेतस्थळावर जाऊन 'बीड' जिल्हा निवडावा, त्यानंतर 'परळी वैजनाथ नगर परिषद' निवडून 'सभा कामकाज' या विभागावर क्लिक करावे. तेथे नियम व अटी मान्य केल्यानंतर (I Agree) संबंधित तारखेचे ठराव सर्वसामान्यांना पाहण्यासाठी व अभ्यासासाठी उपलब्ध होतील.नगरपरिषदेने घेतलेले निर्णय, विविध विषयांवरील चर्चा आणि मंजूर झालेले ठराव आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना प्रशासकीय घडामोडींची अचूक माहिती मिळणार आहे.या सुविधेचा सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर परिषद परळी वैजनाथ च्या वतीने करण्यात आले आहे. 

कसे पाहाल इतिवृत्त?

--------------------

१. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित https://mahaulb.in या संकेतस्थळावर जा.

२. आपला जिल्हा आणि नगरपरिषद (ULB) निवडा.

३. उजवीकडील मेनूमध्ये (तीन आडव्या रेषा) 'सभा कामकाज/ठराव' विभागात जा.

४. अटी मान्य (I Agree) केल्यानंतर ६ फेब्रुवारी आणि २० एप्रिल २०२६ च्या सभांचे इतिवृत्त डाऊनलोड करता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....