महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..

घरकुल घोटाळा :तत्कालीन मुख्याधिकाऱ्या सह सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा



४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार

केज:- केज नगर पंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न करता नियमबाह्य पद्धतीने ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. इतर खात्यावर वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या तक्रारी वरून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल यांच्यासह सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा फक्त पात्र घरकुल लाभार्थ्यांना देणे आवश्यक असताना, दि. २० मे ३०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये एकूण रक्कम ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतरांच्या संगनमताने लाभार्थ्या व्यतिरिक्त इतर खात्यावरती वर्ग केला. तक्रारी वरून ती रक्कम वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा अहवाल नगरपंचायत केज यांनी जिल्हाधिकारी, बीड यांना सादर केला. जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेशान्वये उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशी समितीने चौकशी करून तपासणीचा परिपूर्ण अहवाल मा. जिल्हाधिकारी यांना सादर केल्या नंतर तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतर कर्मचारी यांनी संगणमत करून ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये शासनाचे कोणतेही निर्देश नसताना नियमबाह्य पद्धतीने इतर खात्यावर रक्कम वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केले. अशी तक्रार केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजित गणपतराव ढोपे यांनी पोलीस स्टेशन, केज येथे दिली होती. त्याची सखोल चौकशी केल्या नंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल घोटाळ्याच्या आर्थीक गैरव्यवहारा बाबत तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत, तत्कालीन लेखापाल असद इसाकोद्दीन खतीब, कंत्राटी लेखापाल यांचे सहायक लक्ष्मण मारोती जगताप (से.नि.) आणि व्हॉल्वमन भास्कर एकनाथ ससाणे, भीमराव शामराव मस्के, बासेद वलीयोद्दीन काझी या सहा जणांच्या विरुद्ध गु.र.नं.२३६/२०२६, भा. दं. वि. ४०९, ४२०, २०१, २०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :- या घरकुल घोटाळ्या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहायक पोलीस निरीक्षक संदिप मांजरमे, यांनी पोलीस स्टेशन केज येथे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....