पोस्ट्स

मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...

इमेज
परळीत ‘ गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर; गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत आज परळी वैजनाथ येथे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गो-प्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करावे आणि गोवंश हत्या बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान देशातील ५००० हून अधिक तहसील कार्यालयांत] एकाच वेळी राबविण्यात आले.       परळी शहरात सकाळी या अभियानानिमित्त औद्योगिक वसाहत सभागृहापासून शांततामय मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर गो-भक्तांनी एकत्रितपणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तिला अधिकृतपणे 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे.,,संपूर्ण देशात गोवंश हत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा अमलात आणावा:,बेवारस आणि वृद्ध गोवंशाच्या संगोपनासाठी असलेल्या ग...
इमेज
परळी वैजनाथ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सुधारणा कामांना मंजुरी; पाच जलकुंभांची होणार तातडीने दुरुस्ती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची माहिती परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि जलकुंभांच्या दुरुस्तीसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत (बंधनकारक अनुदान) ४५ लाख १९ हजार ८८३ रुपयांच्या विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा जलकुंभ दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी दिली आहे.        राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदे कडून सादर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा सुधारणांच्या प्रस्तावास १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, 'बद्ध अनुदानातून' निधी पाणीपुरवठा आणि जलपुनर्भरण कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार म...

महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..

इमेज
घरकुल घोटाळा :तत्कालीन मुख्याधिकाऱ्या सह सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार केज:- केज नगर पंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न करता नियमबाह्य पद्धतीने ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. इतर खात्यावर वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या तक्रारी वरून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल यांच्यासह सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा फक्त पात्र घरकुल लाभार्थ्यांना देणे आवश्यक असताना, दि. २० मे ३०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये एकूण रक्कम ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतरांच्या स...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
  परळीत उद्या सामूहिक श्रीसूक्त हवन सोहळा .. परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील अंबेवेस भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य बहुसोमयाजी श्री यज्ञ मार्तंड सद्गुरु श्री यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा धार्मिक विधी संपन्न होणार आहे. श्री सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित या हवनासाठी लागणारे सर्व साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सामूहिक अनुष्ठानात सहभागी होऊन जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनाचा व हवनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा हवन सोहळा सायंकाळी ठीक ५:३० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाची सांगता वेळेत व्हावी, या दृष्टीने भाविकांनी वेळेचे बंधन पाळावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, सर्व यज्ञसेवकांनी पूर्वतयारी आणि सहकार्यासाठी सायंकाळी ५:०० वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कायम ग्लोबल विकास ट्रस्टच्या सोबत राहू - अंजली दमानिया

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या कामामुळे बीडमध्ये सकारात्मक परिवर्तन! अंजली व अनिश दमानिया यांचा दोन दिवशीय कृषीकुल दौऱ्यात प्रभावी सुसंवाद माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही भेट; शेती - मातीच्या विषयावर सखोल चर्चा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कधीकाळी तीव्र दुष्काळ, शेतीचे अपयश आणि मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर यासाठी ओळखला जाणारा बीड जिल्हा आज हळूहळू सकारात्मक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिवर्तनामागे ग्लोबल विकास ट्रस्टच्या सातत्यपूर्ण आणि शाश्वत कामाची मोठी भूमिका असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. २०१२ साली बीड जिल्ह्यात प्रथम दौरा केल्याच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “त्या वेळी अनेक गावांमध्ये अत्यंत विदारक परिस्थिती होती. पाण्याचा तीव्र दुष्काळ, शेती संकटात आणि गावात केवळ लहान मुले व वृद्धच दिसत असत. मात्र गेल्या काही वर्षांत झालेल्या कामांमुळे आज या परिस्थितीत लक्षणीय बदल झालेला दिसतो.” त्या पुढे म्हणाल्या की, २०१६ पासून माझे बंधू मयंक गांधी आणि संजय परमार यांनी ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यां...
इमेज
  परळीत  महिलांसाठी  आयोजित मोफत कर्करोग निदान शिबिराचे नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळोवेळी सर्व तपासण्या केल्या पाहिजे - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ: प्रतिनिधी...     आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्यविषयक काळजी वाहणाऱ्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबतही जागरूक राहून वेळोवेळी सर्व तपासण्या केल्या पाहिजे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी केले. परळी वैजनाथ येथील अरिहंत जैन सेवाभावी संस्था आणि विवेकानंद कॅन्सर अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'मोफत कर्करोग निदान शिबिरा'चे उद्घाटन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.    परळी वैजनाथ येथे आयोजित मोफत शिबिराचा मोठ्या संख्येने महिला वर्गाने लाभ घेतला. या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग निदानासाठी आधुनिक 'कोल्पोस्कोपी' व 'थर्मल ब्रेस्ट स्क्रीनिंग'द्...
इमेज
वादळी वाऱ्यात दुर्दैवी घटना; लिंबाचे झाड कोसळून महिलेचा मृत्यू  माजलगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील मोगरा येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील लिंबाचे झाड कोसळून सुमनबाई हरिभाऊ घनघाव या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मोगरा येथे शुक्रवारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे एक दुर्दैवी अपघात घडला. शेतात असताना लिंबाचे झाड अचानक कोसळले आणि त्याचा फाटा सुमनबाई हरिभाऊ घनघाव यांच्या पोटात घुसला. या गंभीर जखमेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना माजलगाव व संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुमनबाई या शेळ्या राखण्याचे काम करत होत्या तसेच त्या घनघाव कुटुंबातील कुटुंबप्रमुख होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून मोगरा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाती मृत्यूची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मागासवर्गीय समाजाच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....