पोस्ट्स

इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...
इमेज
खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्वरक्षा संकल्प शिबीराचा समारोप उत्साहात परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)       खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वरक्षा संकल्प शिबीराचा गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. १९ ते ३० एप्रिल दरम्यान या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.     या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे तसेच स्वरक्षणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तायक्वांदो, कुंफू, कराटे, लाठीकाठी, तलवार यांसारख्या क्रीडा प्रकारांतील कौशल्यपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैजनाथ ईटके यांनी सांगितले की “आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे मैदानावरील खेळ कमी होत चालले आहेत. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण होते,” तर डॉ शिका जैन यांनी सांगितले की “स्वरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि...

निवेदनाची दखल घेवुत-निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी

इमेज
  शासनाने जाहिर केल्याप्रमाणे सिमेंट रोड करा-नागरिकांची जिल्हाधिकाऱ्याकडे प्रत्यक्षात मागणी निवेदनाची दखल घेवुत-निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी परळी वै., प्रतिनिधी - मुख्यमंत्र्यांनी 1000 लोकसंख्या असलेल्या गावाला सिमेंट रोड करणार असे जाहिर केले आहे. त्याप्रमाणे परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी सिमेंट रोड करावा अशी मागणी सेलु सरपंच शिवकन्या फड व लोणी सरपंच जे.बी. सोनवणे व ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षामध्ये भेटून निवेदन दिले.  सेलु परिसरातील व लोणी परिसरातील सर्व नागरिकाशिवाय दत्तवाडी येथे लाखो भक्तगण आपला जीव मूठीत घेवून प्रवास करतात. पावसाळ्यात तर अक्षरशः कोणत्या नागरिकाचा अपघात होवून जीव जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सेलु सरपंच शिवकन्या फड व लोणी सरपंच जे.बी. सोनवणे व ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे व सर्व नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री सुनेत्रा जी पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, परळी विधानसभेचे ...
इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.
इमेज
  ​प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'प्रबोधनरत्न' पुरस्कार; परळीत  सत्कार परळी ,प्रतिनिधी: प्रख्यात सिने नाट्य लेखक आणि दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'एकता रंगकर्मी प्रबोधनरत्न पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचा परळी येथे भव्य सत्कार करण्यात आला. परळी सिने नाट्य कलावंत संघटना व मित्रपरिवारातर्फे डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ.सिद्धार्थ तायडे यांचे स्वागत व अभिनंदन केलेज्येष्ठ साहित्यिक व संपादकभीमयुगकार रानबा गायकवाड,प्रसिद्ध कवी व निवेदक बा. सो. कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, नवनाथ दाने, दत्ता मामा लांडे, मुख्याध्यापक शेख सर, शास्त्री कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे-

इमेज
  उष्मघातापासून बचाव करण्याच्या सूचना बीड, दि. 30 (जि. मा. का.) उष्माघाताची कारणे-उन्हामध्ये शारिरीक श्रमामुळे,उन्हात मजुरीचे कामे फार वेळ करणे,कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे,जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.घट्ट कपड्यांचा वापर करणे.उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे ही उष्माघात होण्याची कारणे आहेत.लग्न उत्सव, यात्रा याठिकाणी अति उन्हात थांबणे व फिरणे, उष्माघाताचे लक्षणे- चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे,शरीराचे तापमान खूप वाढणे,पोटात कळा येणे,शरीरातील पाणी कमी होणे,त्वचा कोरडी होणे,डोके दुखणे.बेशुद्ध होणे अथवा अस्वस्थ होणे, जोखीम गट- 5 पेक्षा कमी वयाची बालके 65 पेक्षा जास्त वय असणारे जेष्ठ नागरिक,अधिक कष्टाची सवय नसणारी व्यक्ती. धूम्रपान, मद्यपान करणारी व्यक्ती,मुत्रपिंड,-हदयरोग, यकृत,त्वचा विकार,लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण. अति आद्रता, वातानुकुलनाचा अभाव, शेतकाम, कारखान्यातील काम करणारे कामगार, उष्णतेशी संबधित व्यवसाय करणारे व्यक्ती.  उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे- पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली ...

सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी मानले आभार

इमेज
  परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा ऐतिहासिक निर्णय; सर्वानुमते ठराव मंजूर ; नगराध्यक्षा व नगरपरिषदेचे आभार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगरपरिषदेच्या दि. 30 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत “प्रत्येक सोमवारी मांस विक्री बंदी” या महत्त्वपूर्ण विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दि. 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आजच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून अंतिम मंजुरी देण्यात आली. परळी नगरपरिषदेच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा *सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी* यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या “विकास पर्व 2.0” या संकल्पनेतून जनभावना, धार्मिक संवेदनशीलता आणि स्थानिक गरजा यांचा समतोल साधणारे प्रशासन दिसून आले. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच परळीच्या पवित्रतेचा सन्मान राखण्याचा त्यांचा दृष्टीकोन या निर्णयातून अधोरेखित झाला आहे. या निर्णयासाठी  प...
इमेज
  परळीत ६७ व्या महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा; आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त परळी शहरात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता परळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. धनंजय पंडितराव मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परळीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनी या समारंभाचे आयोजन केले असून, त्यांनी परळी शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांना या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेला आणि हुतात्म्यांच्य...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....