परळीत ६७ व्या महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा; आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन
परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त परळी शहरात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता परळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. धनंजय पंडितराव मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
परळीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनी या समारंभाचे आयोजन केले असून, त्यांनी परळी शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांना या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेला आणि हुतात्म्यांच्या स्मृतीला वंदन करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा