निवेदनाची दखल घेवुत-निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी

 शासनाने जाहिर केल्याप्रमाणे सिमेंट रोड करा-नागरिकांची जिल्हाधिकाऱ्याकडे प्रत्यक्षात मागणी




निवेदनाची दखल घेवुत-निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी

परळी वै., प्रतिनिधी -

मुख्यमंत्र्यांनी 1000 लोकसंख्या असलेल्या गावाला सिमेंट रोड करणार असे जाहिर केले आहे. त्याप्रमाणे परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी सिमेंट रोड करावा अशी मागणी सेलु सरपंच शिवकन्या फड व लोणी सरपंच जे.बी. सोनवणे व ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षामध्ये भेटून निवेदन दिले. 

सेलु परिसरातील व लोणी परिसरातील सर्व नागरिकाशिवाय दत्तवाडी येथे लाखो भक्तगण आपला जीव मूठीत घेवून प्रवास करतात. पावसाळ्यात तर अक्षरशः कोणत्या नागरिकाचा अपघात होवून जीव जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सेलु सरपंच शिवकन्या फड व लोणी सरपंच जे.बी. सोनवणे व ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे व सर्व नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री सुनेत्रा जी पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, परळी विधानसभेचे धडाडीचे आ. धनंजय जी मुंंडे, बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 04/02/2026 पासुन निवेदन देवून तसेच ईमेलद्वारे त्वरीत सिमेंट रोड करावा अशी मागणी केलेली आहे. मा.मुख्यमंत्र्यांच्या क्रमांक 10094844 दि.17/04/26 नुसार ही कार्यवाही ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, मुंबई-01 यांच्याकडे कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पाठवलेली आहे. 

काल दि.30/04/2026 प्रत्यक्षामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देवून सिमेंट रोडची मागणी केलेली आहे शिवाय लेक-लाडकी या योजनेअंतर्गत विधवा असलेल्या महिलेच्या व पुनःविर्वाह न केलेल्या मुलीच्या लग्नासाठी शासनाकडून मदत मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. शिवाय मुख्यमंत्री बालआशिर्वाद योजनेची माहिती मिळावी यासाठीही निवेदन दिलेले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन नोंदणी क्रं.8886618 व 8886635 द्वारे कार्यवाहीस सुरुवात झालेली आहे. याचवेळी महाराष्ट्र दिन सोहळ्यामध्ये प्रत्यक्षामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ताटे व कौसल्ये यांनी भाग घेतला. 

त्वरीत सर्व प्रश्न आम्ही शासनाच्या नियमानुसार सोडवू असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रत्यक्षामध्ये निवेदन देत असलेल्या विलासराव ताटे व सुरेश कौसल्ये यांना दिले आहे. संबंधित कार्यालय व या विभागाचे लोकप्रतिनिधी त्वरीत प्रश्न सोडवतील अशी आशा सर्व नागरिक करित आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...