बीड जिल्ह्यात पुन्हा एक खून!
विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; पतीसह सासरा व सासूवर गुन्हा दाखल बीड: हुंड्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचरु किसन घुले यांनी याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी संध्या हिचा विवाह २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा, सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. लग्नानंतर काही दिवसांतच तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या पावलाने घरात यश आले नाही, असे म्हणून पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांनी तिचा छळ सुरू केला. तसेच माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिला मारहाण केली जात होती. ८ जून २०२६ रोजी संध्या हिचा मृतदेह कुटेवाड...