आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

इमेज
  सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणा...

कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या दालनात होणार बैठक...

 खरीप २०२५ मधील प्रलंबित पीक विम्यासाठी धनंजय मुंडेंच्या मागणीनुसार २६ मे रोजी मुंबईत बैठक

प्रचंड अतिवृष्टी होऊनही शेतकरी पिकविम्यापासून वंचित, धनंजय मुंडेंनी तोडगा काढण्यासाठी राज्य स्तरावर बैठकीची केली होती मागणी

मुंबई (प्रतिनिधी) - मागील वर्षी सन २०२५ मध्ये खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही, याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार येत्या २६ तारखेला (मंगळवार) कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


मागील वर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून खरीप हंगामाच्या शेवटी पिके काढणीच्या तोंडावर सातत्याने प्रचंड अतिवृष्टी, ढगफुटी व जिल्हाभर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा अद्याप मिळालेला नाही. विमा कंपन्यांचे धोरण आणि पीकविमा योजनेत झालेले बदल यामुळे पात्र असूनही बीड जिल्ह्यातील शेतकरी वंचित असून यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाने ही बैठक बोलावली आहे. 

धनंजय मुंडे हे स्वतः मागील काळात कृषीमंत्री असताना देशात मागील दहा वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक पीकविमा महाराष्ट्रात मंजूर करण्यात आला होता. विमा कंपन्यांच्या नफेखोरी तसेच निकषांना फाटा देत तांत्रिक बाबींच्या आधारे मुंडेंनी विमा कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले होते, त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पीकविमा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या