मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन

मे, २०२६ मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पशु वैद्यकीय अधिकारी (गट - अ) परीक्षेस पात्र करा - धनंजय मुंडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सचिवांना तपासून योग्य कार्यवाहीचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) - मे, २०२६ मध्ये पशु वैद्यकीय पदवी प्राप्त करून इंटर्नशिप करत आलेल्या विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल, २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पशु वैद्यकीय अधिकारी (गट - अ) या परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सोमवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 

२५ एप्रिल, २०२५ रोजी लोकसेवा आयोगाने पशु वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र पशु संवर्धन सेवा, गट अ या पदासाठी २७९७ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती, या जागांची परीक्षा येत्या ११ जून रोजी संपन्न होणार आहे. 

सदर जाहिरातीत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात internship करत असलेल्या विद्यार्थ्यांची अर्हता पूर्ण नसल्याने त्यांना आयोगाकडे अर्ज करता येत नव्हता. मात्र राजस्थान लोकसेवा आयोगाने internship करत असलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक पशु चिकित्सा अधिकारी पदासाठी पात्र ठरवले असल्याचे महाराष्ट्र पशु वैद्यकीय विद्यार्थी संघटनेने धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सदर परीक्षा जून महिन्यात होणार असून, त्यापूर्वीच मे महिन्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक अर्हता पूर्ण केली असल्याने त्यांना या परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली असून, याच संदर्भात पशु संवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही पत्र देण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री महोदयांनी प्रकरण तपासून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार