पोस्ट्स

इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...
इमेज
  संतवाङ्मयाचे संशोधक ॲड.दत्तात्रय महाराज यांचा सत्कार   तेलगाव(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तिडके म्हणाले की,दत्तात्रय महाराज यांचे संतवाङ्मयाचे संशोधक म्हणून केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून अलक्षित संत जगमित्र चरित्र आणि अभंग गाथा तसेच मराठी भाषेचा आद्य कवीचा ग्रंथ "सार्थ विवेकसिंधु" यावरील संशोधन हे अद्वितीय असून संत जगमित्र यांच्या विषयी त्यांनी संबध आयुष्य वेचले आहे असे गौरवोद्गार काढले.
इमेज
  ॲड.पांडुरंग तिडके यांचा सत्कार तेलगाव (प्रतिनिधी ) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या तर्फे वकील म्हणून नेमणूक ॲड.पांडुरंग तिडके यांची नेमणूक झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील एल.एल.एम. पास झालेल्या पैकी श्री पांडुरंग तिडके  एक आहेत.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखेर आमरण उपोषण सुरू

इमेज
अंबलवाडी वृक्षलागवड घोटाळा: मुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे तक्रार करूनही कारवाई नाही :बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखेर आमरण उपोषण सुरू ​४० हेक्टरमधील ६४,००० झाडांची लागवड फक्त कागदोपत्रीच? | मजुरांना डावलून जेसीबीचा वापर; नातेवाईकांच्या खात्यावर लाखो रुपयांची बिले उचलल्याचा आरोप ​परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी तालुक्यातील अंबलवाडी वनक्षेत्रात सन २०२५-२६ मध्ये झालेल्या वृक्षलागवड कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार आणि निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मंत्रालयापासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत वारंवार लेखी पुरावे देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने, अखेर आज दिनांक २३ जून २०२६ रोजी निसर्गप्रेमी व जागरूक नागरिक धीरज लक्ष्मण जंगले आणि बाबा शेख गफार यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वनविभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​जिवंत झाडांची कत्तल आणि कागदोपत्री लागवड ​आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबलवाडी शिवारातील ४० हेक्टर वनजमिनीत सुमारे ६४,००० नवीन वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले ...
इमेज
  परळीच्या भूमिपुत्राचा छत्रपती संभाजीनगर येथे गौरव योग प्रशिक्षक पोलिस हवालदार सचिन डाके यांचा प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्यालयाच्या मैदानावर भव्य योग व प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परळी वैजनाथचे भूमिपुत्र तथा योग प्रशिक्षक पोलिस हवालदार सचिन डाके यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचे स्थान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सचिन डाके यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध योगासने, प्राणायामाचे प्रकार आणि तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या योगक्रिया प्रत्यक्ष करून दाखवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे योग व प्राणायामाचा सराव केला. या कार्यक्रमास राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 च्या समादेशक श्रीमती कविता नेरकर-पवार, सहायक समादेशक श्री. किसन येमुरे, समादेशक सहायक श्री. अकबर शेख, तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिर...
इमेज
  महेश अर्बन को-ऑप. बँक लि. येथे महेश नवमी निमीत्त महेश प्रतिमेचे पूजन महेश अर्बन को-ऑप. बँक लि., परळी वैजनाथ येथे महेश नवमी निमीत्त महेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी परळीचे सुप्रसिध्द डॉक्टर  राजेंद्र जाजू यांचे हस्ते महेश प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी  हरीप्रसाद सारडा,  ओमप्रकाश तापडीया,  पवन तोतला इ. मान्यवर उपस्थित होते.      महेश प्रतिमेच्या पुजनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेंद्र जाजू यांचा सत्कार बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी केला.  हरीप्रसाद सारडा यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन गाडे यांनी केला.  ओमप्रकाश तापडीया यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष  ओमप्रकाश सारडा यांनी केला. तर  पवन तोतला यांचा सत्कार प्रदीप मुंडे यांनी केला.याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कचरूलालजी उपाध्याय व बँकेचे सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थीत होते.

सर्व स्तरांतून ओरड झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग....

इमेज
  बीड जिल्ह्यातील शाळांची वेळ : शिक्षण विभागाने आधीच्या आदेशात केली सुधारणा परळी वैजनाथ | प्रतिनिधी       अल निनोच्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद बीड यांनी सोमवार, दि. २३ जून २०२६ रोजी सुधारित आदेश जारी केले आहेत.          जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्माघात, निर्जलीकरण तसेच इतर उष्णतेशी संबंधित आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुधारित आदेशानुसार, दि. २३ जून २०२६ पासून पुढील आदेश होईपर्यंत सर्व शाळांचे नियमित कामकाज सकाळी ७ वाजता सुरू करण्यात येणार आहे. शाळेची वेळ सकाळी ८.०० ते दुपारी १२.३० अशी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार विद्यार्थ्यांचे अध्यापन व ...

परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या