पोस्ट्स

इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...
इमेज
तुकाराम मुंडे यांची अखेर उचलबांगडी मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळी विरोधात कठोर मोहिम राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारने महत्वाच्या पदावरुन उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्वाच्या पदावरुन हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सुरुवातीस आयुक्तपद हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे ना खूश होते. मात्र राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरु केली आहे. मुंढे यांनी गेल्या पंधरा- वीस दिवसात भेसळीविरोधात धडक मोहिम राबविली असून अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कावाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हाॅटेलवरही मुंढे यांनी कारवाई करीत आपल...

विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन

इमेज
  परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी परळी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना निवेदन विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-              परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा विकास जनता परिषद आणि इतर विविध संघटनांच्या वतीने ८ जून रोजी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून दि. १८ जून रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपाळ कृष्णन यांनी, तर आज दि. २३ जून रोजी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांनी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी व विविध मागण्यांचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिले निवेदन दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे.            प...
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...
इमेज
  संतवाङ्मयाचे संशोधक ॲड.दत्तात्रय महाराज यांचा सत्कार   तेलगाव(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तिडके म्हणाले की,दत्तात्रय महाराज यांचे संतवाङ्मयाचे संशोधक म्हणून केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून अलक्षित संत जगमित्र चरित्र आणि अभंग गाथा तसेच मराठी भाषेचा आद्य कवीचा ग्रंथ "सार्थ विवेकसिंधु" यावरील संशोधन हे अद्वितीय असून संत जगमित्र यांच्या विषयी त्यांनी संबध आयुष्य वेचले आहे असे गौरवोद्गार काढले.
इमेज
  ॲड.पांडुरंग तिडके यांचा सत्कार तेलगाव (प्रतिनिधी ) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या तर्फे वकील म्हणून नेमणूक ॲड.पांडुरंग तिडके यांची नेमणूक झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील एल.एल.एम. पास झालेल्या पैकी श्री पांडुरंग तिडके  एक आहेत.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखेर आमरण उपोषण सुरू

इमेज
अंबलवाडी वृक्षलागवड घोटाळा: मुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे तक्रार करूनही कारवाई नाही :बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखेर आमरण उपोषण सुरू ​४० हेक्टरमधील ६४,००० झाडांची लागवड फक्त कागदोपत्रीच? | मजुरांना डावलून जेसीबीचा वापर; नातेवाईकांच्या खात्यावर लाखो रुपयांची बिले उचलल्याचा आरोप ​परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी तालुक्यातील अंबलवाडी वनक्षेत्रात सन २०२५-२६ मध्ये झालेल्या वृक्षलागवड कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार आणि निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मंत्रालयापासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत वारंवार लेखी पुरावे देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने, अखेर आज दिनांक २३ जून २०२६ रोजी निसर्गप्रेमी व जागरूक नागरिक धीरज लक्ष्मण जंगले आणि बाबा शेख गफार यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वनविभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​जिवंत झाडांची कत्तल आणि कागदोपत्री लागवड ​आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबलवाडी शिवारातील ४० हेक्टर वनजमिनीत सुमारे ६४,००० नवीन वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले ...
इमेज
  परळीच्या भूमिपुत्राचा छत्रपती संभाजीनगर येथे गौरव योग प्रशिक्षक पोलिस हवालदार सचिन डाके यांचा प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्यालयाच्या मैदानावर भव्य योग व प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परळी वैजनाथचे भूमिपुत्र तथा योग प्रशिक्षक पोलिस हवालदार सचिन डाके यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचे स्थान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सचिन डाके यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध योगासने, प्राणायामाचे प्रकार आणि तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या योगक्रिया प्रत्यक्ष करून दाखवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे योग व प्राणायामाचा सराव केला. या कार्यक्रमास राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 च्या समादेशक श्रीमती कविता नेरकर-पवार, सहायक समादेशक श्री. किसन येमुरे, समादेशक सहायक श्री. अकबर शेख, तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिर...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या