पोस्ट्स

मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

वाकेकर प्रतिष्ठान व म. सा. प.चा संयुक्त उपक्रम*

इमेज
स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप उपक्रम  वाकेकर प्रतिष्ठान व म. सा. प.चा संयुक्त उपक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहर व परिसरातील शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.         सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने चालत आला असून याही वर्षी समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक उत्तरदायित्वाची भावना म्हणून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचची माहिती वाकेकर प्रतिष्ठान व परळी म.सा.प.चे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर व परळी म.सा.प.चे सचिव राजकुमार यल्लावाड यांनी दिली आहे. समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांचा आज स्मृतीदिन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करणारे समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या शुक्रवार दि. 27 जून स्मृतिदिन आहे. यानिमित्त समाधीस्थळी अभिवादन, शाळांमध्ये करणार शालेय ...
इमेज
  समर्पित व्यक्तिमत्त्वाचे धनी - स्व. सुवालालजी (ललवाणी) वाकेकर     समाजभूषण स्वर्गीय सुवालालजी (ललवाणी) वाकेकर… हे केवळ एका समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व नव्हते तर सर्वच समाजासाठी ते एक  संस्कारांचे विद्यापीठ, माणुसकीचा अखंड झरा आणि कर्तृत्वाचा दीपस्तंभ होते.     माणूस मोठा त्याच्या संपत्तीने नव्हे तर त्याच्या विचारांनी, सेवाभावाने आणि माणुसकीने मोठा होतो ही त्यांनी दिलेली शिकवण आजही परळी आणि परिसरातील सर्वच समाजाला सर्व जाती-धर्माला  खऱ्या अर्थाने घालून दिलेला एक स्तुतिपाठ म्हणावी लागेल.      आयुष्यभर स्वतःपेक्षा समाजकार्याला  प्राधान्य देत असंख्य गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे सुवालालजींचे  कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे.  सुवालालजींच्या चेहऱ्यावरील साधेपणा,मनातील उदारता आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव हा आजही इतरांना प्रेरणादायी असाच आहे.  या जगामध्ये सुवालालजी सारखी मोजकीच माणसे असतात की ज्यांचं चांगुलपण कुठल्याच मोजपट्ट्यात मोजता येत नाही.         दूरवर पसरल...
इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...
इमेज
  परळी येथे छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी शाहु महाराजांनी समता आणि बंधुता याची पेरणी केली-सौ.पद्मश्री धर्माधिकारी परळी वै.  - छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती महिला महाविद्यालयाच्या सभागृहीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.  समता आणि बंधूता यावर वक्त्यांनी आपला भर दिला. राजर्षी शाहु महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांचा रोष पत्करून आपल्या राज्यामध्ये आरक्षण अंमलात आणले. प्रत्यक्षामध्ये स्वतः सर्व क्षेत्रामध्ये पुढाकार घेवून जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचे जनक म्हणुन त्यांची ओळख आहे. आजही सर्वांना त्यांची आठवण कायम राहते. विशेष म्हणजे यावेळी सर्व पाहुण्यांचा सत्कार हारांनी न करता झाडांची रोपटे देवून केला.  या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटक परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी न.प. चे बांधकाम सभापती पवन मुंडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित आघाडीचे महासचिव मिलिंद घाडगे, नगरसेवक अनंत इंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज...

निष्पक्ष व सर्व बाजूंनी तपास होण्यासाठी पाठपुरावा करणार - मुंडेंनी घुले कुटुंबाचे केले सांत्वन

इमेज
स्व. विलास घुले व उमेश माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू - धनंजय मुंडे कुणाला मुद्दाम अडकवणे हेतू नाही, पण गुन्ह्यात सहभाग असल्यास, सुटला नाही पाहिजे - धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती पीडितांच्या कुटुंबियांना धमकावले जात असेल तर पोलिस काय करतात? मुंडेंचा संताप निष्पक्ष व सर्व बाजूंनी तपास होण्यासाठी पाठपुरावा करणार - मुंडेंनी घुले कुटुंबाचे केले सांत्वन केज (प्रतिनिधी) - चार दिवसांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी परिसरात झालेल्या दुर्दैवी हत्याकांडात मृत पावलेल्या स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची आज टाकळी येथे जाऊन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले.  आरोपींनी संगनमत करून सामान्य गरीब कुटुंबातील उमेश माने या तरुणावर आधी जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचवायला गेलेल्या विकासाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुटुंबियांना विलासच्या मृतदेहासहित तीन दिवस तिष्ठत बसवण्यात आले, हे क्लेशदायक आणि संतापजनक असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.  या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी स्वतंत्र एस आय टी समिती स्थापन करण्यात आली असली तर...
इमेज
सामाजिक कार्यकर्ते संतोष  शिंदे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी; सकल मराठा समाजाचे निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भैय्या (जीवनराव) शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा वस्तुस्थितीला धरून नसून संबंधित फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर घटना ही किरकोळ मतभेदातून घडलेली असून, चोरी करणे किंवा गंभीर स्वरूपाची इजा पोहोचविणे असा कोणताही हेतू संतोष शिंदे यांचा नव्हता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संतोष भैय्या शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून परळी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या...

प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या