इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

 परळी येथे छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी



शाहु महाराजांनी समता आणि बंधुता याची पेरणी केली-सौ.पद्मश्री धर्माधिकारी

परळी वै.  -

छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती महिला महाविद्यालयाच्या सभागृहीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. 

समता आणि बंधूता यावर वक्त्यांनी आपला भर दिला. राजर्षी शाहु महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांचा रोष पत्करून आपल्या राज्यामध्ये आरक्षण अंमलात आणले. प्रत्यक्षामध्ये स्वतः सर्व क्षेत्रामध्ये पुढाकार घेवून जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचे जनक म्हणुन त्यांची ओळख आहे. आजही सर्वांना त्यांची आठवण कायम राहते. विशेष म्हणजे यावेळी सर्व पाहुण्यांचा सत्कार हारांनी न करता झाडांची रोपटे देवून केला. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटक परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी न.प. चे बांधकाम सभापती पवन मुंडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित आघाडीचे महासचिव मिलिंद घाडगे, नगरसेवक अनंत इंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलासराव ताटे यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल फुलारी यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेबराव रोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ कल्याणकर, विकास पवार, हरिप्रसाद मोदाणी, रमाकांतअप्पा निर्मळे, राजेंद्र रणदिवे, ज्ञानेश्वर गित्ते, राजु जगताप, वसंतराव बनसोडे, बालासाहेब पोरे, भिमराव रिकीबे, नारायण मानकर, यशवंत अभंग, अनिकेत भातांगळे, महेश राडकर इत्यादींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या