वाकेकर प्रतिष्ठान व म. सा. प.चा संयुक्त उपक्रम*

स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप उपक्रम 



वाकेकर प्रतिष्ठान व म. सा. प.चा संयुक्त उपक्रम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहर व परिसरातील शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.

        सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने चालत आला असून याही वर्षी समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक उत्तरदायित्वाची भावना म्हणून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचची माहिती वाकेकर प्रतिष्ठान व परळी म.सा.प.चे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर व परळी म.सा.प.चे सचिव राजकुमार यल्लावाड यांनी दिली आहे.

समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांचा आज स्मृतीदिन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करणारे समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या शुक्रवार दि. 27 जून स्मृतिदिन आहे. यानिमित्त समाधीस्थळी अभिवादन, शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे स्व. सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांनी सांगितले.

       विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्षपद, परळीचे नगराध्यक्षपद आणि साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पदावर काम करून आपली वेगळी ओळख करणाऱ्या स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या शुक्रवार दिनांक 27 जून रोजी स्मृतिदिन आहे. सकाळी गंगाखेड रोडवरील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात येणार आहे. 

         स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळांमध्ये स्व. सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विजयकुमार वाकेकर यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार