– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

 समर्पित व्यक्तिमत्त्वाचे धनी - स्व. सुवालालजी (ललवाणी) वाकेकर




    समाजभूषण स्वर्गीय सुवालालजी (ललवाणी) वाकेकर… हे केवळ एका समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व नव्हते तर सर्वच समाजासाठी ते एक  संस्कारांचे विद्यापीठ, माणुसकीचा अखंड झरा आणि कर्तृत्वाचा दीपस्तंभ होते.   

 माणूस मोठा त्याच्या संपत्तीने नव्हे तर त्याच्या विचारांनी, सेवाभावाने आणि माणुसकीने मोठा होतो ही त्यांनी दिलेली शिकवण आजही परळी आणि परिसरातील सर्वच समाजाला सर्व जाती-धर्माला  खऱ्या अर्थाने घालून दिलेला एक स्तुतिपाठ म्हणावी लागेल.

     आयुष्यभर स्वतःपेक्षा समाजकार्याला  प्राधान्य देत असंख्य गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे सुवालालजींचे  कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

 सुवालालजींच्या चेहऱ्यावरील साधेपणा,मनातील उदारता आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव हा आजही इतरांना प्रेरणादायी असाच आहे.

 या जगामध्ये सुवालालजी सारखी मोजकीच माणसे असतात की ज्यांचं चांगुलपण कुठल्याच मोजपट्ट्यात मोजता येत नाही.    

    दूरवर पसरलेल्या क्षितीजासारखं त्यांचं मोठेपण हे कितीही सांगायचं झालं तरी शब्दात मावत नाही.

    अशा माणसांचं आयुष्य हे संपून सुद्धा स्मृती रूपान शिल्लक राहिलेलं असतं.

   या काळाच्या भाळावरती 

तेजाचा तू लाव टिळा 

आणि फुलू दे तुझ्या श्रमातून 

मानवतेचा इथे मळा...

    असा त्यांच्या कर्तृत्वाने फुलविलेला माणुसकीचा मळा ते आपल्यातून गेले तरी तो फुलतच राहत असतो...

    असाच आपल्या माणुसकीचा मळा फुलवून आपल्यातून निघून जाऊन 20- 22 वर्ष होऊन सुद्धा त्यांचा स्मृतिगंध आजही ताजा वाटतो असं बहुआयामी प्रेरणा स्त्रोत आणि माणुसकीचा मूर्तिमंत झरा म्हणजेच समाजभूषण सुवालालजी वाकेकर होत.

सुवालालजींना आपल्यातून जाऊन दोन दशकांच्या वर कालावधी उलटून गेला असला तरी त्यांच्या कार्याचा दरवळ सुगंधासारखा सर्वदूर पसरलेला आहे तो आजही सर्वांच्या कायम स्मरणात आहे.

   स्वर्गीय सुवालालजींचे जीवन म्हणजे मानवतेसाठी समर्पित होते. उच्च शिक्षण घेऊन आपले आयुष्य नोकरी किंवा व्यवसायात पूर्णपणे वाहून न घेता त्यांनी सामाजिक दातृत्वाची भावना जपली आणि आपलं सर्व आयुष्य समाज कार्यासाठी त्यांनी समर्पित केलं.

   चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय चहू कडे सुगंधाचा दरवळ पसरत नाही त्याप्रमाणे त्यांनी आपलं अख्ख आयुष्य हे इतरांसाठी सत्कारणी लावलं. त्यासाठी त्यांनी उद्योग व्यवसायाव्यतिरिक्त शैक्षणिक,सामाजिक व राजकीय चळवळीत आपला एक वेगळा ठसा उमटवून आपल्या कार्याची वेगळी छाप दाखवली आणि आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले.

 घरंदाज, संपन्न अशा ललवाणी परिवारात सुवालालजींच्या पायाशी सर्व सुखे लोळण घेत असताना त्यांचा त्याग करून इतरांच्या भल्यासाठी ते सतत धडपडत राहिले.

  आज आपण सामाजिक स्थिती पाहत असताना पावला पावलावर आपली निष्ठा आणि तत्व बदलणाऱ्या व स्वार्थाने बरबटलेल्या या जगात सुवालालजी सारखे व्यक्तिमत्व अगदी दुर्मिळच...

    सुवालालजींनी आपल्या कुटुंबाला उच्चशिक्षित तर केलेच शिवाय अनेकांना उद्योग व्यवसायात मदतीचा हात दिला, अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

  परळी व परिसरातील भावी पिढी शैक्षणिक दृष्ट्या मागासली राहू नये म्हणून त्यांनी सत्तरच्या दशकात लिटल फ्लॉवर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, यासाठी त्यांनी आपली स्वतःची जमीन दान देऊन येथे शिक्षणाची रुजवन केली. यातून त्यांचे दातृत्व आणि दानशूरपणा सर्वांच्या प्रत्ययास येतो.

    याशिवाय परळीतील नामांकित असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक दृष्ट्या सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते नेहमीच क्रियाशील राहिले.

    मराठवाड्यातील नामांकित असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावरही त्यांनी सचिव म्हणून आपले भरीव योगदान दिलेले अनेकांच्या सदैव स्मरणात आहे.

   राजकीय क्षेत्रातील आपल्या कार्य कौशल्याने त्यांनी परळीच न. प. चे नगराध्यक्ष व काही काळ नगराध्यक्ष म्हणून आपला एक वेगळा ठसा उमटवला होता.

 काँग्रेस पक्षाची वैचारिक बांधिलकी जोपासताना त्यांनी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत स्नेहभाव जपत आपले जिवाभावाचे संबंध आणि ऋणानुबंध शेवटपर्यंत टिकवले आणि वाढवले.

    साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीतही त्यांचे योगदान अनन्य साधारण व संस्मरणीय राहिले होते.

    मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेचा त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आजही परळीकरांसाठी सुवर्णकाळ मानला जातो.

 साहित्य आणि शैक्षणिक योगदानामुळे त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक्झिटिव्ह कौन्सिल सदस्य आणि सिनेटचे सदस्य म्हणूनही वर्णी लागली. त्यांनी तेथेही आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली.  एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातही झळाळी प्राप्त करून दिली म्हणून त्यांना जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आणि भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी मध्ये त्यांना स्थान मिळाले.

    स्वर्गीय सुवालालजींच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेत असताना सुवालालजींनी सामाजिक, राजकीय व इतर चळवळीमध्ये काम करत असताना मानवता ही केंद्रस्थानी ठेवून कार्य केले, म्हणून त्यांच्या कार्याला सोन्यासारखी झळाळी प्राप्त झाली.

 नम्रता, विनयशीलता, चारित्र्यसंपन्नता,मानवतेचा पूजक, सकारात्मक मनोवृत्ती असणारा उदारमतवादी, सामाजिक दृष्टी असणारा आशावादी, स्नेहसंबंध जपणारा हितचिंतक, सहकार्याची भावना ठेवणारा सन्मित्र, अनेक जबाबदाऱ्या पिलून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा निर्मळ मनाचा माणूस, पतीधर्म निभावणारा प्रेमळ पती,  आपल्या कुटुंबाची जडणघडण करणारा कुटुंब वत्सल पिता आणि सर्व जाती धर्मातील मित्र परिवारासाठी माणुसकीचा मूर्तीमंत झरा अशा अनेक बिरुदावली काकाजींना शोभतात.

  आज त्यांच्या स्मृतीदिनी मागे वळून पाहताना त्यांच्या अनंत स्मृती अगदी डोळ्यासमोर मोरपिसासारख्या  स्मृती पटलावर जाग्या होतात.

   करून जावे असेही काही 

दुनियेतून या जाताना 

गहिवर यावा जगास साऱ्या

 निरोप शेवट देताना...

 या काव्यपंक्तीप्रमाणे काकाजींच्या पावन स्मृतींनी अंतकरण आजही गहिवरून येते.

    पण शेवटी नियतीच्या हाती सर्व जगाचा पसारा असल्याने

 गेले त्यांना आता

 कुणी कसे गावे

 पुन्हा उगवावे -जोमदार 

  याप्रमाणे सुवालालजींच्या पश्चात ललवाणी (वाकेकर ) परिवारावर आपल्या मातृत्वाची सावली देणाऱ्या चंचलदेवी,मुले विजय वाकेकर, डॉ.प्रकाश वाकेकर,दीपक वाकेकर आणि मुलगी दिपाली जैन व संपूर्ण ललवाणी (वाकेकर ) परिवार काकाजींनी जपलेल्या माणुसकीच्या बहुआयामी कार्याचा वसा आणि वारसा पुढे नेत आहेत हेच त्यांचे खरे पुण्यस्मरण आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

-अनंत मुंडे

कार्याध्यक्ष :- मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या