पोस्ट्स

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

इमेज
  आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्...

नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...
इमेज
बीड जिल्ह्यातील शाळा उद्यापासून नियमित वेळेत; उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश बीड:चालू आठवड्यात झालेल्या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्यापासून (१ जुलै २०२६) पूर्ववत नियमित पूर्ण वेळ भरवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिले आहे. शाळा पूर्ण वेळ होणार: १ जुलै २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व शाळा नियमित पूर्ण वेळेत सुरू होतील.वातावरणातील बदल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे उन्हाचा कडाका कमी झाला आहे. दि. २३ ते २९ जून दरम्यान सकाळच्या सत्रामुळे (सकाळी ८:०० ते १२:३०) कमी झालेल्या तासिकांची भरपाई पुढील काळात केली जाईल. शिक्षण हक्क अधिनियम (RTE) २००९ नुसार हे अध्यापनाचे तास भरून काढले जातील. यापूर्वी अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शाळांच्या वेळेत कपात केली होती. आता हवामानात सुधारणा झाल्याने शाळा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्...

केंद्र सरकारच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका करण्याची मुंडेंची विनंती...

इमेज
नोकरीच्या आमिषाने म्यानमार मध्ये ओलिस ठेवलेल्या बीड जिल्ह्यातील तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तरुणांना फसवून मानवी तस्करी करणाऱ्या महाराष्ट्रातील एजंटांच्या जाळ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करा मोठ्या पगाराचे आमिष दाखवत तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी आणि जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवणारे रॅकेट मुंबई (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार - थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून ...

धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

इमेज
  परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे.  माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, सुधारित आराखड्यास नव्याने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी या ६३ कामांना सुधारित मान्यता देण्याबाबत शिखर समितीने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  प्रत्यक्षात परळी वैद्यनाथ येथे मंदिर व परिसरात या विकास कार्यक्रमात भव्य दर...
इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

चला हरित परळी घडवूया......

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्ट, वृक्ष संवर्धन चळवळ आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात वटपौर्णिमेच्या औचित्यावर विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, वृक्षसंवर्धन चळवळ व नगरपालिका प्रशासन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, सोमवार २९ जून रोजी शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, विद्यार्धिनी विद्यालय व भेल स्कूलमध्ये पथनाट्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आणि वृक्षतोडीचे दुष्परिणाम अत्यंत सोप्या आणि अंगाव...
इमेज
आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांना ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार–२०२६’ प्रदान छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी येथे दैनिक वृत्तरत्न सम्राट आयोजित भव्य वाचक मेळाव्यात समाजकार्याचा गौरव करणारा विशेष सोहळा उत्साहात पार पडला. आंबेडकरी चळवळीतील तत्त्वनिष्ठ आधारस्तंभ, बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले सदस्य तथा स्मृतिशेष मा. रामचंद्रजी (अप्पा) इंगळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार–२०२६’ यंदा भारतीय बौद्ध महासभा, लातूर जिल्हाध्यक्ष तथा किनगावच्या लोकनियुक्त सरपंच आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि आकर्षक मानपत्र असे होते. सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, बौद्ध धम्मप्रसार आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी स्मृतिशेष मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांन...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या