धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

इमेज
  परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे.  माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, सुधारित आराखड्यास नव्याने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी या ६३ कामांना सुधारित मान्यता देण्याबाबत शिखर समितीने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  प्रत्यक्षात परळी वैद्यनाथ येथे मंदिर व परिसरात या विकास कार्यक्रमात भव्य दर...

चला हरित परळी घडवूया......

ग्लोबल विकास ट्रस्ट, वृक्ष संवर्धन चळवळ आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात वटपौर्णिमेच्या औचित्यावर विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, वृक्षसंवर्धन चळवळ व नगरपालिका प्रशासन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, सोमवार २९ जून रोजी शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, विद्यार्धिनी विद्यालय व भेल स्कूलमध्ये पथनाट्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश

वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आणि वृक्षतोडीचे दुष्परिणाम अत्यंत सोप्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या प्रसंगांतून लोकांसमोर मांडण्यात आले.

ग्लोबल विकास ट्रस्ट आणि प्रशासनाचा स्तुत्य पुढाकार

ग्लोबल विकास ट्रस्ट आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळीचे कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पर्यावरणपूरक कामांमध्ये सक्रिय आहेत. या मोहिमेला नगरपालिका प्रशासनाची मोलाची साथ लाभली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाला किंवा महत्त्वाच्या प्रसंगी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या