मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

इमेज
  आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्...

बीड जिल्ह्यातील शाळा उद्यापासून नियमित वेळेत; उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश

बीड:चालू आठवड्यात झालेल्या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्यापासून (१ जुलै २०२६) पूर्ववत नियमित पूर्ण वेळ भरवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिले आहे.

शाळा पूर्ण वेळ होणार: १ जुलै २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व शाळा नियमित पूर्ण वेळेत सुरू होतील.वातावरणातील बदल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे उन्हाचा कडाका कमी झाला आहे. दि. २३ ते २९ जून दरम्यान सकाळच्या सत्रामुळे (सकाळी ८:०० ते १२:३०) कमी झालेल्या तासिकांची भरपाई पुढील काळात केली जाईल. शिक्षण हक्क अधिनियम (RTE) २००९ नुसार हे अध्यापनाचे तास भरून काढले जातील. यापूर्वी अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शाळांच्या वेळेत कपात केली होती. आता हवामानात सुधारणा झाल्याने शाळा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या