राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे.
नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा