इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय*

 


*परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश*


*परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय*



परळी (प्रतिनिधी) : राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून तट प्रयत्नांना आता यश आले आहे.


राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.


परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्यातील ७ उपविभाग असे ४ विभाग आणि २९ उपविभाग आता परळी मंडळास जोडण्यात आले आहेत.


या अंतर्गत जायकवाडी मंडळाचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करून लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर या नावाने नवीन मंडळ कार्यालय अस्तित्वात येणार आहे याअंतर्गत मंडळ कार्यालयाच्या विभाजनानंतर बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ याअंतर्गत पूर्वीचे ३ व गंगाखेड येथील नवीन १ असे ४ विभाग व २९ अतिरिक्त उपविभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड अंतर्गत ४ विभाग तसेच २४ उपविभाग कार्यालय आता परळी येथून कार्यान्वित करण्याचे आदेश या शासन निर्णयाअंतर्गत देण्यात आले आहेत.


पूर्वाश्रयीच्या भाजप सरकारने परळी येथील सिंचन भवन विभागीय कार्यालय पळवून लातूरला नेन्याचा घाट घातला होता परंतु धनंजय मुंडे यांनी यास त्या वेळी विरोध करत आपली भूमिका मांडली होती.  जलसंपदा विभागाअंतर्गत परळी तालुक्याचे वैभव वाढवणारा निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या