इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS: सोनपेठ,केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडुन स्वागत .

 

केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडुन स्वागत .

सोनपेठ दि.२४(प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेती संबधाने काढलेल्या तीन अध्यादेशांचे शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व हे अध्यादेश कायद्यात रुपांतरीत करण्याची मागणी करण्यात आली.

देशातील शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे या साठी शेतकरी संघटना गेली चाळीस वर्ष लढा देत आहे .या लढाईतील प्रमुख मागण्यापैकी एक शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य असावे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही बाजारात विकता यावा ही मागणी केंद्र सरकारने एक बाजार एक देश ही घोषणा करत शेतमालाचा बाजार सामान्य नागरीकांसाठी एका अध्यादेशा द्वारे खुला केला आहे. या मुळे शेतकरी आपला माल आता थेट विकू शकणार आहे .तसेच दुसऱ्या एका अध्यादेशामुळे शेतीमाल आवश्यक वस्तु कायद्याच्या बाहेर काढल्यामुळे सरकार आता शेतीमालाच्या किमंती नियंत्रीत ठेवणार नाही तसेच करार शेतीच्या अध्यादेशामुळे शेतीत गुंतवणूक वाढणार असल्याने थेट शेतीला फायदा होणार आहे .

हे तीन ही अध्यादेश शेती व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याने केंद्र सरकारच्या या धाडसी अध्यादेशाचे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. या संबधाने शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ आशिषकुमार बिरादार यांना निवेदन देण्यात आले . या वेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष सोमनाथ नागुरे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या