इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS: *स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित - धनंजय मुंडे यांची माहिती* *अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ*

 *स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित - धनंजय मुंडे यांची माहिती*


*अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ*



मुंबई ) ------- : अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज (दि. २८) वितरित करण्यात आला असून लवकरच लाभार्थी  विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेनंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते.  त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी ३५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.  धनंजय मुंडे यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.


काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती मोठ्या शहरांपूरती मर्यादित न ठेवता ती वाढवून तालुका स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.


त्यानंतर आता विद्यार्थ्यांची बाकी असलेली देयके देण्यासाठी तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून वितरित केल्याने कोविडच्या या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे; याबद्दल गेल्या काही दिवसांपासून मागणी करणाऱ्या अनेक  विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या