इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:(VIDEO)विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे परळीत भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे परळीत भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी करण्यासाठी सध्या दौऱ्यात असलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अंबाजोगाईहून परळीमार्गे परभणी कडे रवाना होतांना इटके काॅर्नर येथे परळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तत्पुर्वी या धावत्या दौऱ्यात ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला.

          अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधन्यासाठी विधान सभेचे विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यातील दौऱ्यात आहेत.आज सायंकाळी अंबाजोगाई येथून परभणी कडे मार्गस्थ होताना ते आवर्जून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथ गडावर गेले.याठिकाणी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन त्यांनी आशिर्वाद घेतला. इटके काॅर्नर येथे परळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

•                  ••••••••• video••••••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या