परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- *चांदापुर (ता.परळी) येथे 8 फेब्रुवारी रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन*

 *चांदापुर (ता.परळी) येथे 8 फेब्रुवारी रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन*



*_धम्म परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-डॉ.अरविंद गायकवाड व राजेन्द्र घोडके यांचे आवाहन_*

=====================

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म परिषदेला पुज्य भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खु ज्ञानरक्षीत (औरंगाबाद),पुज्य भिक्खु धम्मशील (हिंगोली,बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला धम्मप्रेमी उपासकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.अरविंद गायकवाड (औरंगाबाद) व धम्म परिषदेचे संयोजक तथा तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व राजेंद्र घोडके आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.या धम्म परिषदेेचे "सम्यक संकल्प" या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.



तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता होणा-या सातव्या बौद्धधम्म परिषदेची तयारी पुर्ण झाली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे संपन्न होणार्या सातव्या धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्मध्वजारोहण होईल.स्वागताध्यक्षपदी डॉ.अरविंद गायकवाड (औरंगाबाद) हे असणार आहेत.तर या धम्म परिषदेला परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर तर यावेळी आ.संजयभाऊ दौंड यांची विशेष उपस्थिती तर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिवकन्याताई सिरसाट आणि माजी आ.पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच यावेळी तहसिलदार सुरेश शेजूळ (परळी),अधिक्षक डॉ.भारत सोनवणे (औरंगाबाद),उपविभागीय अभियंता पी.एस.नागरगोजे (अंबाजोगाई), गटविकास अधिकारी संजय केंद्रे (परळी),जि.प.सदस्या सौ.आशाताई दौंड, जि.प.सदस्य डॉ.मधुकर आघाव,चंद्रशेखर वडमारे,डॉ.विनोद जगतकर,उपसरपंच श्रीहरी गित्ते यांची उपस्थिती असणार आहे.संयोजन समितीने चांदापुर येथे होणा-या या धम्म परिषदेची तयारी पुर्ण केली आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशानुसार सर्व निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे.धम्म परिषदेस सर्वांनी पांढरे वस्ञ परिधान करूनच या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रकांत इंगळे,प्रा.प्रदिप रोडे, राजेंद्र घोडके,राहुल घोडके,प्रा.गौतम गायकवाड,सचिन वाघमारे,जगन सरवदे,विश्वनाथ हरिभाऊ भालेराव, सिमा चंद्रकांत इंगळे आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे बौद्धाचार्य मुरलीधर कांबळे,बौद्धाचार्य दिलीप वाघचौरे, माणिक रोडे,मधुकर वेडे,व्यंकट वाघमारे, मिलींद नरबागे,राज जगतकर,प्रभाकर बडे,प्रा.बी.एस.बनसोडे,राजाभाऊ घाटे, किशोर इंगळे,चंद्रकांत बनसोडे,संजय साळवे (पुस),सुरेखा रोडे, अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे,धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे,शिलाताई जोगदंड,रूक्मीण गोरे,सुभाष वाघमारे,बुद्धकरण जोगदंड,संजय जोगदंड,श्रीराम वैद्य आदी परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!