इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *धनंजय मुंडे शुक्रवार गहिनीनाथगडावर करणार महापूजा; संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास राहणार नियमितपणे उपस्थित* *बीडमध्ये घेणार जनता दरबार*

 *धनंजय मुंडे शुक्रवार गहिनीनाथगडावर करणार महापूजा; संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास राहणार नियमितपणे उपस्थित*



*बीडमध्ये घेणार जनता दरबार*


बीड (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे हे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे येऊन संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित महापूजेस (शुक्रवार दि. ०५) उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


सकाळी ७.०० वा. या महापूजेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर ना. मुंडे हे याच परिसरातील श्री क्षेत्र हनुमानगड येथेही दर्शनासाठी जाणार आहेत. 


त्यानंतर दुपारी २.०० वा. बीड शहरातील डीपी रोड येथील डॉ. गणेश राऊत यांच्या श्री.विश्ववेद अमृत चिकित्सालय या आयुर्वेदिक दवाखान्याचे उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते होणार असून, दुपारी अडीच वाजल्यापासून ते राष्ट्रवादी भवन, बार्शी रोड बीड येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत नागरिकांच्या भेटींसाठी उपलब्ध असतील. 


तद्नंतर बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे भेट व काही नियोजित भेटीगाठी आटोपून ते परळीकडे रवाना होणार असल्याचे ना. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या