मुख्य सामग्रीवर वगळा
इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर काम करणारे नेते; विधानसभेला 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम

  

शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर काम करणारे नेते; विधानसभेला 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम


सांगोला :   

महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सोलापूरमध्ये एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पित्ताशयाची शस्त्रक्रिया ही पडली पार पडली. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला  मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. शेतकरी कामगार पक्षाकडून  सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आबासाहेब या नावाने ते परिचित होते

त्यांचा जन्म 10 आॕगस्ट 1926 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्यांचा लौकीक होता. गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. त्यांनी पहिल्यांदा 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा केवळ दोनदाच पराभव झाला. 1972 आणि 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले. 1972 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या 1974 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना लागला तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच ‘विरोधीपक्ष नेते’ पद सांभाळले होते. त्यानंतर 1978 मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री झाले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. एसटी बसने प्रवास आणि साधी राहणी यामुळे ते लोकप्रिय होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या