MB NEWS-लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्यांना आली अशीही प्रचिती !*

 *पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू* 



*लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्यांना आली अशीही प्रचिती !*


बीड । दिनांक ०२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एक फोन करताच सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या नामांकित हाॅस्पीटलमध्ये लगेच उपचार सुरू झाले आणि व्याकुळ झालेल्या माता-पित्याच्या चेहर्‍यावरील चिंतेचे सावट दूर झाले. लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा प्रचिती आली याचे हे उदाहरणच म्हणावे लागेल.


त्याचे असे झाले की, सिरसाळा ता. परळी येथील मोईज पठाण या कार्यकर्त्याचे जवळचे नातेवाईक जावेद शेख यांचा मुलगा (६ वर्ष) अबुजर याच्या ह्रदयाला छिद्र होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची खूप गरज होती. डाॅक्टरांनी त्याच्या कुटुंबाला मुंबईच्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हाॅस्पीटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. मोईज पठाण हे त्या बालकाला व त्याच्या आई-वडिलांना घेऊन मुंबईत आले पण तिथे कोणी दाद लागू देत नव्हते. शेवटी मोईज यांनी सकाळीच पंकजाताई मुंडे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. पंकजाताईंनी लगेचच हाॅस्पीटलचे विश्वस्त जाहेदखान यांना फोन केला व हे माझ्या जवळची माणसं आहेत, त्या बालकांला दाखल करून घ्या आणि उपचार सुरू करा असे सांगितले. या फोननंतर हाॅस्पीटलची सुत्रे हलली आणि अबुजर याचेवर लगेच उपचाराची प्रक्रिया सुरू झाली.

पंकजाताईंच्या एका फोनमुळे उपचार सुरू झाल्याचे पाहून मोईन व बालकाच्या आजाराने व्याकुळ झालेल्या माता-पित्याच्या चेहर्‍यावरील चिंता दूर झाली. संकटकाळात गरजेच्या वेळी धावून आल्याबद्दल त्यांनी पंकजाताईंचे खूप खूप आभार मानले.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !