MB NEWS- *कर्नाटक मध्ये घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध;परळीत सोमवारी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक !* 🕳️ _शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी_

 *कर्नाटक मध्ये घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध;परळीत सोमवारी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक !*



🕳️ _शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटक मध्ये घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत असुन परळीत उद्या (दि.२०) सोमवारी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

         राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या सूचनेनूसार तसेच सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा आहे त्या त्या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला "दुग्धाभिषेक" करायच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत उद्या सोमवार दिनांक 20 डिसेंबर सकाळी 10:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे "छत्रपती शिवराय" यांच्या "अश्वारुढ पुतळा" येथे दुग्धाभिषेक होणार आहे.यावेळी अभिवादनास  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !