MB NEWS-*रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट* 🕳️ *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी निवेदन*

 *रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट*



🕳️  *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री.सुनीत शर्मा यांची काल दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेतली व बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यां संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.


जिल्ह्यातील रेल्वेमार्गात असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्त्यांच्या बांधणीत असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासंदर्भात मी संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि त्यांचे तत्परतेने निराकरण होईल असे श्री.शर्मा यांना सूचित केले.


तसेच नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या जलद रेल्वे गाड्यांना  घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार