इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-चोर साडून सन्याशाला शिक्षा; शाळकरी मुलांना बेदम मारहान परळी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप

 चोर साडून सन्याशाला शिक्षा; शाळकरी मुलांना बेदम मारहान

 


परळी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप

 

परळ । प्रतिनिधी

परळी शहरातील मोंढा भागांत फिरणाऱ्या लहान मुलांना परळी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून अमाणूषपणे बेदम मारहाण करण्यात आली. हि घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत मुलाच्या पालकांनी पोलिसांकडे कारण विचारले असता कोणतेही कारण त्यांना देण्यात आले नाही.

सदरील घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर पालिका व पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने परळीच्या मोंढा भागांतील अतिक्रमण हटाव मोहिम चालू होती. ही कारवाई चालू असतांना रस्त्याने जाणाऱ्या दोन शाळकरी मुलांना अडवून तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दान्हीही मुलांना मुका मार लागला आहे. शाळकरी मुलांना अडवून पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. चोर सोडून सन्याशालाच शिक्षा देण्याचा प्रताप परळी शहर ठाण्याच्या पोलिसांनी केला आहे. मारहाण का केली? या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने या घटनेची तक्रार बीड जिल्हा पोलिस अधिक्षक आणि मानवाधिकार आयोगाकडे करण्याची पालकांची मानसिकता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या