इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

 पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन



उज्जैन-

     उज्जैनमधील मित्तल रेहेनुच्या सम्राट विक्रमादित्य संकुलात मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजप राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेश सहप्रभारी पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.



   यावेळी मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, संघटनेचे महामंत्री सुहास भगत, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, केंद्रीय मंत्री पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्थे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट