इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-घोटकर कुटूंबियांचे विद्यार्थी सेने कडून सांत्वन* *मुलीच्या मृत्युला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी-प्रा.अतुल दुबे*

 *घोटकर कुटूंबियांचे विद्यार्थी सेने कडून सांत्वन*



*मुलीच्या मृत्युला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी-प्रा.अतुल दुबे*


परळी वै.(प्रतिनिधी)

       महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घोटकर कुटूंबातील चिमुकलीचा मृत्यू झाला असुन या कुटूंबा विद्यार्थी सेनेच्या वतीने बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी सांत्वन करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.

      महावितरणच्या मनमानी व हलगर्जीपणामुळे एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना दि 9 रोजी दुपारी 03:00 च्या सुमारास घडली.  रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून करंट उतरत असल्याचे या भागातील नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवले मात्र या बाबीकडे महावितरण कर्मचारी व कार्यालयाने दुर्लक्ष केले या मुळे भागातील  सहा वर्षीय मुलगी गौरी वैजनाथ घोटकर ही खांबाच्या संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला.

       घोटकर कुटूंबियांचे भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,शहर प्रमुख गजानन कोकीळ, दिपक जोशी, श्रीनाथ विभुते, योगेश घेवारे यांनी भेट घेऊन सांत्वन केले आणि पोलीस प्रशासनाला या घटनेतील दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या