MB NEWS-सिरसाळा बाजारात मोबाईलची चोरी;गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल,पर्स चोरीच्या घटना वाढल्या !

 सिरसाळा बाजारात मोबाईलची चोरी;गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल,पर्स चोरीच्या घटना वाढल्या !



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         तालुक्यातील सिरसाळा आठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.आज दि.११ रोजी बाजारात एका पत्रकाराचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

       सिरसाळा येथे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल,पर्स चोरीच्या घटना  वाढलेल्या बघायला मिळत आहेत.या अनुषंगाने पोलीस बाजाराच्या दिवशी प्राधान्याने लक्ष ठेवून आहेत.आज दि.११ रोजी बाजारात पत्रकार अनुप कुसुमकर हे खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारला.याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!