इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शेतकऱ्यांना शेतीसाठी होणारा विज पुरवठा योग्य वेळेत करावा-राजेश गित्ते.

 शेतकऱ्यांना शेतीसाठी होणारा विज पुरवठा योग्य वेळेत करावा-राजेश गित्ते

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

 सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू आहे.शेतकरी रब्बी पिके हरभरा, गहू, ज्वारी आदि पिकांना पाणी देण्यात मग्न आहेत.विजमंडळाने गेल्या महिन्यात ट्रान्स्फर बंद केल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे व रब्बी पिके धोक्यात आली आहेत.शेतकरी अडचणीत असताना ही त्यांनी विज मंडळाकडे पैसे भरून ट्रान्स्फर चालू करून घेतले आहेत.परंतु विज मंडळ शेतीसाठी होणारा विज पुरवठा रात्री उशिरा १२नंतर देत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.सध्या खुप थंडी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्रास होत आहे.तरी विज मंडळाने शेतीसाठी होणारा विज पुरवठा याची वेळ बदलून दयावी अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा नेते राजेश गित्ते यांच्या सह शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंता आंबाडकर साहेब यांना देण्यात आले या निवेदनावर नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, शेतकरी नेते बालासाहेब गिते, अवधूत लांडगे, कारभारी गिते, प्रदिप गिते आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या