इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-वैद्यनाथ कारखान्याची 'ऑनलाईन' सर्वसाधारण सभा खेळीमेळीत !

 वैद्यनाथ कारखान्याची 'ऑनलाईन' सर्वसाधारण सभा  खेळीमेळीत  !



सर्व ऊसाचे गाळप करणार;गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर



परळी ।दिनांक २४।

      वैद्यनाथ साखर कारखान्याने पुढील गळीत हंगाम वेळेवर सुरू करून विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे सांगून केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या सहकार्याने साखर उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सभासदांसमोर बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, अनेक अडचणींवर मात करून गळित हंगाम यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल शेतकरी व संचालक मंडळाने त्यांचे या सभेत आभार मानले आहेत. 

          

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने  उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी पंकजाताई बोलत होत्या. बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

          प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी पंकजाताई मुंडे यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संचालक व्यंकटराव कराड यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर आणि कर्मचारी यांच्या वतीने आभार व्यक्त केले. 

    यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, कर्मचारी यांचा विचार करून आणि आर्थिक अडचणींवर मात करून कारखाना सुरू केला आहे.  केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शहा यांनी सहकारी कारखान्यांना आधार देणारे निर्णय घेतले त्याचाही फायदा झाला आहे. आगामी काळात साखर कारखान्यांना आर्थिक सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असल्याने हा  उद्योग आर्थिक संकटातून बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


*सर्व ऊसाचे गाळप करणार ; शेतकऱ्यांनी काळजी करू नये*

--------------

यावर्षीचा गाळप हंगाम व्यवस्थित सुरू आहे. कारखाना उशीरा सुरू झाल्याने प्रोग्राम थोडा लेट आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सर्व ऊसाचे गाळप केले जाणार आहे अशी ग्वाही यावेळी पंकजाताई मुंडे यांनी दिली. आगामी काळात कारखाना आर्थिक सक्षम होणार आहे, याचा शेतकरी, ऊसतोड मजूर, आणि सर्व उद्योगांना फायदाच होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. 


*गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

------------

दरम्यान गुढी पाडव्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना प्रति शेअर्सला 10 किलो साखर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रति किलो रूपये 25 भाव निश्चित करण्यात आला असल्याचे अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.


    प्रारंभी  सभेचे अहवाल वाचन कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी केले तर आभार प्रदर्शन जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी केले. सभेचे संचलन जनसंपर्क अधिकारी ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. संचालक सर्वश्री पांडुरंगराव फड, श्रीहरी मुंडे, ज्ञानोबा मुंडे, दत्तात्रय देशमुख, केशवराव माळी, शामराव आपेट, गणपतराव बनसोडे, भाऊसाहेब घोडके, आश्रोबा काळे, किशनराव शिनगारे, त्रिंबकराव तांबडे,  संदीप लाहोटी, रमेश कराड, सतीश मुंडे आदींची यावेळी उपस्थिती होती. सर्व संचालक मंडळ आणि बहुसंख्य सभासदांनी आॅनलाईन उपस्थिती लावली.

••••

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....