इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पंकजाताईंची कोल्हापुरात जंगी सभा

 राज्यातील सरकार महा आघाडीचे नाही तर 'महा बिघाडी'चे -पंकजाताईंचा घाणाघात





कोल्हापूर  । दिनांक ०७।

राज्यातील तीन पक्षाचे सरकार हे महाविकास आघाडीचे नसून महाबिघाडीचे आहे. हे सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचविण्यासाठी धडपड करत आहे. समाजातील कोणताच वर्गाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही, याला आता जनताच पूर्णपणे कंटाळली असून बदलाची वाट पहात आहे असा घणाघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी बुधवारी येथे प्रचार सभेत बोलतांना केला. महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर त्याची सुरवात कोल्हापुरातील विजयाने करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Click:कोल्हापूर दौऱ्यावर असणार्‍या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत !*

  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीतील भाजपा, रिपाइं, जनसुराज्य, ताराराणी आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी खा. धनंजय महाडिक, समरजितराजे घाडगे, आ. सिद्धार्थ शिरोळे, युवा मोर्चाचे विक्रांत पाटील,  महेश जाधव ,उमेदवार सत्यजित कदम, उमाताई खापरे, योगेश टिळेकर आदी  व्यासपीठावर उपस्थित होते.

Click:*संघटनात्मक दृष्टया भाजपला ताकदीने पुढे घेऊन जावू -पंकजा मुंडे*

   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, तीन पक्षाच्या बिघाडी सरकारमध्ये आज कोणतीच जनता खुश नाही. विकास कामे रखडली आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. खून,  दरोडे, हत्या, माफियाराज वाढला आहे. आम्ही दिलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण यांनी घालवले. केवळ भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचविण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. या सर्व कारभाराला जनताच कंटाळली असून कधी बदल होईल याची वाट पहात आहे. अशा सरकारला संपविण्याची वेळ आलेली आहे असे पंकजाताई म्हणाल्या.


उरली सुरली काॅग्रेस संपवा

देशाचे प्रचंड नुकसान करून स्वतःच्याच घरात सत्ता आणणाऱ्या काॅग्रेसला संपूर्णपणे नेस्तनाबूत करायचे आहे, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅग्रेसमुक्त भारत असा नारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निकालावरून ते सिध्द झाले आहे. काॅग्रेसने गरीब शब्दाचा फक्त वापर केला. गरीबी हटावचा नारा दिला पण गरीबी हटवली नाही मात्र गरीबांना हटविण्याचे काम केले अशी टिका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गरीबी अनुभवली आहे, त्यामुळेच त्यांनी गरीब शब्दाच्या भोवती सर्व योजना विणल्या. जन धन, उज्ज्वला गॅस, बेटी बचाओ आदी योजना राबवून त्यांनी महिलांचा सन्मान वाढवला. गरीबांचा खरा कळवळा त्यांच्यामध्ये आहे  असे पंकजाताई म्हणाल्या. 

Click:🔸 *GOOD NEWS: नीट(NEET) परिक्षेची तारीख जाहीर*

नावातच 'सत्यजित' त्यामुळे विजय पक्का

भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या नावातच जित म्हणजे विजय आहे आणि तो सत्याचा आहे त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे, असे पंकजाताई म्हणाल्या. कोल्हापूरचा खरा  विकास साधायचा असेल तर कदम यांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. कोल्हापूर आणि सांगली चे प्रभारी पदाची जबाबदारी आपल्यावर आहे,इथे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेऊ असे सांगून 'जिथे कमी तिथे आम्ही' असेही मिश्किलपणे त्या म्हणाल्या. सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


ठिकठिकाणी जोरदार स्वागत

सभेपूर्वी कोल्हापूरात पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी जोरदार स्वागत केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांनी अभिवादन केले तसेच श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या