इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-परळीत ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गुल; नागरिक वैतागले

 परळीत ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गुल; नागरिक वैतागले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

         बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. परळीतही वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.वीज वितरण च्या नियोजनाची माहितीही दिली जात नाही.नागरिकांचे वीज गुल होण्याबाबत निट उत्तरं देऊन साधं समाधानही केलं जातं नाही.त्यामुळे नागरिकांत प्रचंड चीड, संताप व असंतोष निर्माण झाला आहे.

     अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे. लोडशेडिंग सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे.विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याने लोक वीज मंडळाच्या नावाने शिमगा करत आहेत. विजेच्या मागणीत अचानकपणे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध वीज आणि तुटीमुळे महावितरणला आपत्कालीन भारनियमन (इमर्जन्सी) करावे लागत आहे. उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इर्मजन्सी लोडशेडींग केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षणी वीज जावू शकते. फिडरवाईज चक्रीप्रमाणे लोडशेडींग करण्यात येऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचा  प्रयत्न असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

       दररोज वीज वारंवार खंडित होत आहे. शहरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.ऐन उन्हाळ्यात हाल सोसावे लागत असल्याने नागरीकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या